Dr. Babasaheb Ambedkar नीघुन गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदाम बाबांनी दिली.
नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसार माध्यमांना हि बातमी दिली. ११:५५ वा.मुंबईच्या पी.ई.सोसायटीच्या ऑफीसमध्ये फोन केला. घनश्याम तळवटकर यांना प्रथम खबर दिली. त्यानंतर औरंगाबादला फोन करुन बळवंतराव व वराळे यांना हि दुःखद बातमी सांगितली. त्यानंतर वार्यासारखी हि बातमी सर्वत्र पसरली. दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू व इतर मंत्री यांनी भेट दिली. सायंकाळी ४:३० वा बाबासाहेबांचा पार्थीव देह ट्रकने दिल्ली विमान तळावर आणला. बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली. रात्री ९ वा विमान नागपुरला उतरवण्यात आले. ज्याठिकाणी दिक्षा समारंभ झाला त्याठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आला. १२ वा.हे विमान नागपुरहुन निघाले व रात्री १:५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले त्याठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता. तेथुन बाबासाहेबांना राजग्रहावर आणण्यात आले. त्याठिकाणी प्रचंड आक्रोश सुरु होता. बाबांच्या अंतिमसंस्काराची व्यवस्था सुरु झाली. परंतु सवर्णांनी अंत्यसंस्काराला जागा दिली नाही. हिंदु कॉलनीच्या हिंदु स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करु न देण्याची चर्चा संवर्णात असल्याची जाणीव झली. तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदु म्हनुन मरणार नाही अशी प्रतिग्या करणार्या बाबांचा अंतिमसंस्कार हिंदुंच्या स्मशानात कशाला ?
प्रचंड गर्दि लक्षात घेता त्यांचा अंतिमसंस्कार शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत झाले. पण तत्कालीन म्युनिसीपल कमिश्नर पी. आर. नायक यांनी विरोध केला व परवाणगी नाकारली त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते. तेथे अंत्य संस्कार करण्याचे ठरले. पण ती जागा देण्यासाठी कॉंग्रेसने विरोध केला. तेव्हा बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते सी. के. बोले यांच्या मालकीची जमीन होती. त्या जमीनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले वत्या ठिकाणी बौध्दधम्म विधिनुसार भिक्खु. एच. धर्मानंद यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य यांच्या हस्ते हा अंतिमसंस्कार पार पडला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा झंझावात आणी प्रचंड वादळ शांत झाले. विचार करा मिञांनो बाबासाहेबांच्या मृत्युनंतरही त्यांना किती प्रखर विरोध ह्या लोकानी केला.
🙏🙏🙏🙏🙏
अधिक माहितीसाठी आताच फॉलो करा!