भीमा कोरेगाव केले |Bhim Song Lyrics
________________________________________________
Credits:
लेखक:-
गायक:- आदर्श शिंदे
लेबल:-
_______________________________________________
Lyrics
उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव
गाडिली ती पेशवाई केला वर मी घाव
हे उसळत्या रक्ताचा पाडिला प्रभाव
गाडिली ती पेशवाई केला वर मी घाव
इतिहासात इतिहासात इतिहासात
अजरामर शुर महारांचे नाव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान
तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही हि जाण
बदले महार काय देता आम्हा सम्मान
तुमच्यासाठी लावू आमच्या प्रणास प्राण
अहंकाराने अहंकाराने अहंकाराने
चिढला तो पेशव्यांचा बाजीराव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
तुच्छ हि जात आहे तुमची अति शुद्रांची
आस का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची
असला शुर तुम्ही उच्च जात ही आमची
श्वानापरी होत नाही बरोबरी तुमची
अशी कमृठ त्या अशी कमृठ त्या अशी कमृठ त्या
कावळयांनी बघा केली काव काव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात
स्फूर्ति देई आम्हा आमच्या रक्ताचं नातं
धडकले संघरात लढण्यात शिदनाक
१८१८ साली दिला पेशव्या धाक
मानवंदनेला मानवंदनेला मानवंदनेला
योद्धांच्या येता माझे भिमराव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
भिमा कोरेगाव केले भिमा कोरेगाव
© Jaybhimtalk
*जर तुम्हाला दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
________________________________________________
Listen This Song On YouTube