पिवळा पितांबर मराठी भीम साँग Lyrics
________________________________________________
पिवळा पितांबर...2
त्यात लोकशाहीची जर...2
हिंद च्या डोईवर शोभे घटनेचा पदर...2
पिवळा पितांबर...2
त्यात लोकशाहीची जर...2
हिंद च्या डोईवर शोभे घटनेचा पदर ..2
फुलात सजवाया हिंडले परदारी
गांधी नेहरूजी मंडळी सारी
अमेरिकेची त्या करून तयारी
बर्डन षाज्ञानी हळूच उतरी
की भारत भू सजवेल माझा
भिमराव आंबेडकर आहो तो माझा
भिमराव आंबेडकर
हिंद च्या डोईवर शोभे घटनेचा पदर...2
स्वातंत्र्याचा टिळा तुझ्याच कपाळी
तोडियली जीर्ण रुढीची त्या जाळी
लेणं सौभाग्याच २६ जानेवारी
केली ती करणी भिमानी सत्वरीं
शालूला भरली गं जणू...2
मोत्याची किनार अगं ती मोत्याची किनार
हिंद च्या डोईवर शोभे घटनेचा पदर...2
आधिचेच होते पूर्वीचे शूरवीर
सर्व पुढे लढते बटालियन महार
मराठवाड्यात पेटलं ते काहूर
चिरली चर चर लहान अन थोर
मग डागच हा पदरावर तुझा
डागच पदरावर तुझा
भिजला पितांबर हा भिजला पितांबर
हिंद च्या डोईवर शोभे घटनेचां पदर...2
लोकसभा पहिली गरजले ते शहाणे
सुवर्ण अक्षरी लिहून इतिहासी पाने
करीत अभिमानें या मातीचे सोने
घालता घाला या कुहूर काळाने
दमदेरे आज झाली पोरकी...2
भीमरायाची पोर हि भीमरायाची पोर
हिंदच्या डोई वर शोभे घटनेचा पदर...2
पिवळा पितांबर त्यात
लोकशाहीची जर....2
हिंदच्या डोइवर शोभे घटनेचा पदर....4
© Jaybhimtalk
*जर तुम्हाला दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
________________________________________________
Listen This Song On YouTube
Rmane eka luglayvar diwal kadle rilixs
ReplyDelete