चवदार तळ्याचा सत्याग्रह | Chavdar Tale Satyagraha | Jaybhimtalk

Jay Bhim Talk
0

काय आहे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह....? आणि त्याचा सर्व इतिहास....!
वाचा संपुर्ण माहिती



महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी महाड (सध्या कोलबा जिल्ह्यात), महाराष्ट्र, भारत येथे अस्पृश्यांना सार्वजनिक टाकीतील पाणी वापरण्याची परवानगी देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली केलेला सत्याग्रह होता . हा दिवस (20 मार्च) भारतात सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून पाळला जातो.


सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते.

कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख ही त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते.1९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.


सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार

 जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.

त्यावेळी प्रकाशित केलेले पत्र

चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, "तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे." धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करून चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले.

विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध "हिंसा करू नका" असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते.

नंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी महाडमधे १४वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केेेला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. विष्णू नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करून आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी १९३१ पासुन डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता.

हे सर्व जे काय आपण जगतो, अभिमानाने फिरतो ते सर्व आपल्या Dr Babasaheb Ambedkar यांच्या मुळेच होत आहे. 
ही माहिती जास्तीत जास्त शेयर करून आपला समाजाला जागृत करा जय भीम 💙!

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)