भिमशाहीर महाकवी वामनदादा कर्डक | Vamandada Kardak | Jaybhimtalk

Jay Bhim Talk
0


वामन तबाजी कर्डक

जन्म:- १५ ऑगस्ट, इ.स. १९२२

मुळ गाव:- देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक

मृत्यू:- 15मे, इ.स. २००४,

राष्ट्रीयत्व :-भारतीय

टोपणनाव:- दादा

नागरिकत्व :- भारतीय

धर्म :- बौद्ध

पत्नी :- शांताबाई वामन कर्डक

अपत्ये :- मीरा (जगु शकली नाही)

दत्तक पुत्र :- रविंद्र कर्डक

वडील :- तबाजी कर्डक

आई :-सईबाई तबाजी कर्डक

नातेवाईक :- सदाशीव (भाऊ)

सावित्राबाई (धाकटीबहीण)

वामनदादा म्हणजे वामन कर्डक.सिन्नर तालुक्यात (नाशिक) या खेड्यात १५ ऑगस्त १९२२ मध्ये तपाजी आणि सईबाई यांच्या पोटी जन्मले. वामनदादा अवघ्या तीन वर्षांचे असतानाच वडिलांचं छत्र हरवलं. काही दिवस खेडेगावातच गुरं-ढोरं राखण्याचे काम केले. थोरले बंधू मुंबईला गिरणी मजूर म्हणून कामाला होते. वयाच्या अकराव्या वर्षी मुंबईला भावाकडे कामधंद्यासाठी रवानगी. गिरणीत काम मिळाले. पुढे गिरणी बंद पडली. मग, सायनच्या वखारीत कोळसा वेचायचा आणि कुर्ल्याला नेऊन विकायचा, पोटाची खळगी भरण्यासाठी ही दिनचर्या सुरू झाली. एका मजुराने पत्र वाचण्याची विनंती केली. पत्र वाचता येईना, ही बाब वामनदादांच्या मनाला खूप लागली. मग, प्रयत्नपूर्वक आठ दिवसात बाराखडी पाठांतर केली, पुस्तकांचे वाचन सुरू केले. चित्रपट पाहून, वाचनाअंती त्यांच्यातला गीतकार जागा झाला. भीमराव कर्डक, शाहीर भोसले, शाहीर हेगडे, शाहीर सोनवणे आदी मंडळींचे जलसे पाहून चळवळीकडे पाहण्याची एक वेगळी समज येऊ लागली.

हे पण वाचा: काय आहे काळाराम मंदिर सत्याग्रह चा इतिहास 

  साधारणतः १९५० मध्ये वामनदादा नाशिक येथे स्थायिक झाले. औरंगाबाद येथे बाबासाहेब आले असता त्यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन बाबासाहेबांचा सहवास मिळविण्याच्या उद्देशाने “काहीतरी काम मिळेल काय?” अशी विचारणा केली. यावेळी मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. बाबासाहेब स्वतः बांधकामाकडे लक्ष देत. बांधकाम सुरू असताना बाबासाहेब उन्हात उभे असत तर त्यांना ऊन लागू नये म्हणून ‘बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्री धरण्या’चे काम वामनदादांना मिळाले, ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक त्यांनी केले. कॉलेजचे काम संपल्यानंतर बाबासाहेब मिल्ट्री एरियातील छावणीमध्ये तीन नंबरच्या बंगल्यावर थांबत. तेथे भेटणाऱ्यांशी संवाद साधत तेव्हा त्यांच्या टेबलापासून तीन फूट अंतरावर बसून वामनदादा काळजीपूर्वक ऐकत.

  अखिल मानवमुक्तीसाठी लढा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा एक सजग प्रहरी, चळवळीचा एक डोळस साक्षीदार म्हणून वामनदादांकडे बघावे लागेल.

असेच १९४३ मध्ये राणीच्या बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांनी प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन दादा कर्डक कवी झाले. त्यानंतर २००४ पर्यंत वामन दादांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी बाबासाहेबांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले.वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३,‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६, ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७, ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६ ही त्यांची ग्रंथसंपदा

वामनदादा कर्डकयांचे प्रसिद्ध गाणं.

भीमाची लेखणी 👇👇


सांगा या

वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट – सांगत्ये ऐका)

चल गं हरणे तुरू तुरू ,ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)ही चित्रपट गीते

वामन दादा अनेक व सन्मान मिळालेले पुरस्कार मिळाले

दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप,महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.

महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व ,महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व,औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७),प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७),मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१), प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन,साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७),

जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’

मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’ इ.स. १९९३ मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

आपल्या गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार घराघरात पोहचवणाऱ्या लोकशाहिर वामनदादा कर्डक महान आंबेडकरी चळवळीतील महानायकांचा मृत्यू १५ मे २००४ ला निर्वाण झाले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)