"राजरत्न आंबेडकर" भीम अनुयायांसाठी एक नवा विचार...
राजरत्न अशोक आंबेडकर हे भारतातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत, जे सक्रिय सामाजिक-राजकीय आणि बौद्ध कार्यकर्ते आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (भारतीय बौद्ध महासभा) अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे विचार भारतातील लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
राजरत्न अशोक आंबेडकर यांचा जन्म 8 डिसेंबर 1982 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अशोक आंबेडकर तर आईचे नाव अश्विनी आंबेडकर आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ आनंदराव रामजी आंबेडकर यांचे पणतू आहेत, तर मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू आहेत.
राजरत्न यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नाते –
खरं तर, राजरत्न आंबेडकर हे आनंदराव यांचे पणतू आहे, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू होते. या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजरत्न आंबेडकरांचे चुलत पंजोबा ठरतात, तर त्यांचे वास्तविक पंजोबा आनंदराव आंबेडकर हे होत. आनंदराव यांचा मुलगा मुकुंदराव आंबेडकर (बाबासाहेबांचा पुतण्या) हे राजरत्न आंबेडकरांचे आजोबा आहेत.
बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केले होते, मात्र आज या संघटनेचे अनेक तुकडे झालेले आढळतात. त्यात प्रमुख दोन गट आहेत.
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष अशी ओळख राजरत्न अशोक आंबेडकर सांगताना दिसतात तर, प्रकाश आंबेडकर यांच्या आई आणि बाबासाहेबांच्या सून मीरा आंबेडकर यासुद्धा आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा असल्याचा दावा करतात. मीरा आंबेडकर यांचा मुलगा भीमराव यशवंत आंबेडकर हे या संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून कारभार सांभाळतात.
राजरत्न आंबेडकर यांचे शिक्षण
राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन 2003 मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन 2008 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड ॲंन्ड फायनन्शल अकाउंटंडंट ऑफ इंडिया – देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन 2008 मध्ये एडीएम व सन 2010 मध्ये एमबीए झाले.
व्यवस्थापनात ॲडव्हान्स्ड पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत उच्च पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.
धार्मिक कारकीर्द
भारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही 4 मे 1955रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुरू केलेली एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटना आहे. याचे मुख्यालय मुंबईमध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करत आहेत. ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना ‘द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स’ची सदस्य आहे. ते बँकॉक, थायलंड मधील ‘द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ या जागतिक बौद्ध संघटनेचे सचिव आहेत.
राजरत्न आंबेडकर तीन वेळा निवडणूक लढले आहेत. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, नांदेड लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर लढले आहेत, मात्र त्यांना तृतीत क्रमांकाची मते मिळाली, व प्रथम स्थानी असलेले अशोक चव्हाण विजयी झाले.
Source -Wikipedia
------------------------------------
आम्ही दिलेल्या माहिती मध्ये जर काही बदल हवा असेल तर आम्हाला कळवा.आम्ही नक्कीच करू. महिती आवडल्यास नक्की कॉमेंट आणि शेअर करा. जय भीम
-------------------------------------
*अशाच प्रकारची लेटेस्ट माहिती वाचण्यासाठी आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करा.