भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित परिनिर्वान नावाच्या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले...
'परिनिर्वाण' (Parinirvana) सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'परिनिर्वाण' सिनेमाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसह हजेरी लावली होती.
संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा ऐतिहासिक क्षण..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास 'महापरिनिर्वाण दिन' असे म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या सिनेमात दाखवण्यात येणार 'परिनिर्वाण'च्या मोशन पोस्टरमध्ये 'भारतीय संविधानाचे शिल्पकार, संस्थापक, बहिष्कृत हितकारिणी सभा, प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदान अधिकार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे जनक, हिंदू कोड बिल, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अशा गोष्टी लिहिलेल्या दिसत आहेत.
हेही पाहा: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जूने फोटो
तसेच या पोस्टपमध्ये असेही लिहिण्यात आले आहे,"6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्याच दिवशी सत्य घटनेवर आधारित एका कलावंताच्या आयुष्याचं स्वप्न, प्रेम, त्याग, संघर्ष, दु:ख. जतन केला त्याने इतिहासाचा अमूल्या ठेवा... एक कॅमेरामन, 3000 फुटांची रीळ आणि लाखो लोकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'निर्वाण यात्रा'. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला एक अवलिया कलाकार नामदेव व्हटकर".
प्रसाद ओकने 'परिनिर्वाण' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"धगधगत्या अग्नीतून नव्या युगाचा प्रारंभ आहे...अंत नसून हा आरंभ आहे...!!! 'परिनिर्वाण' लवकरच". त्याच्या या पोस्टवर जय भीम... अंत नसून आरंभ आहेआहे.
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा जय भीम 💙🙏