डॉ.बाबासाहेब आंबेडकर Star Registration Number | Jaybhimtalk

Jay Bhim Talk
1

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर Star Registration Number | Jaybhimtalk 

14 म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती. 14 एप्रिलला 132वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे, देशभरात मोठा उत्साह समजला जातो. भीमसैनिकांकडून महिनाभरापूर्वी वेगवेगळ्या उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र यंदाची बाबासाहेबांची जयंती हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याच रजिस्ट्री करण्यात आली आहे. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. तर सर्वसामान्यांना हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.

मराठी भीम गीतांचे lyrics साठी येथे क्लिक करा

अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी 'इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री' नावाची एक संस्था असून, या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागते. यंदाची बाबासाहेबांची जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी, या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी 9 फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार असून, https:// space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असणारा तारा Star पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स वापरा.


Step 1: https:// space-registry.org  या वेबसाईट वर किँवा यांच्या Android ॲप वर जा.

Step 2: वेबसाईट वर गेल्यावर सर्च टॅब मधे खाली दिलेला कोड Enter करा.

          Code : CX26529US


वरती दिलेला code Enter केल्या नंतर तुम्ही Dr Babasaheb Ambedkar यांचा तर पही शकता.

*आम्हीं दिलेली माहिती जास्तीत जास्त शेयर करून आपला समाजाला जागृत करा जय भीम 💙

_____________________________

आम्हीं कोण आहोत?

 Jay Bhim Talk Is A Ambedkarite Website 

 जय भीम🙏 

आमच्या ह्या पेजवर तुमचे स्वागत आहे. या पेजवर आम्ही तुम्हाला आंबेडकरी दिनविशेष यांची माहिती देणार आहोत. आमचा उद्देश फक्त बौद्ध धर्माचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही आठवणी , घडामोडी , महत्त्वाचे दिवस यांच्या विषयी चे दररोज दिनविशेष देणार आहोत. दररोज च्या updates साठी आत्ताच आम्हाला Instagram वर फॉलो करा.

शेअर करा जय भीम 🙏💙

👇👇👇

Tags

Post a Comment

1Comments

Post a Comment