शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर

Jay Bhim Talk
0

छ. शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 

महार जातीतील डॉ.आंबेडकर नामक ग्रुहस्थाने उच्च पदवी प्राप्त बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेंव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही, जी व्यक्ती महाराजांना भेटायला येई त्या व्यक्तीसमोर बाबासाहेबांचे तोंडभरून कौतुक करून म्हणायचे "आता या बामनांना बौद्धीक बाबतीत शह देण्यास बहुजन समाजातील माणसे हळू हळू पुढे येऊ लागली. "एक दिवस असा उगवेल की या बामनांपेक्षा आमची बहुजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील"शाहू महाराजांजवळ बापुसाहेब महाराज बसलेले असायचे .आंबेडकरांचे चाललेले कौतुन बघून बापुसाहेब म्हणाले, "महाराज एकदा आंबेडकरांना भेटावयास तरी बोलवा" शाहू महाराज प्रसन्न होऊन म्हणाले,"बापसाब अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा"

हिंदु कोड बिल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

योगायोगाने तेथे दळवी आर्टिस्ट आले,त्यांना मुंबईचा खडानखडा माहीत असल्याने महाराजांनी आबेंडकरांना बोलविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीली व त्यांच्या मुंबई प्रवासाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा देऊन महाराज सोनतळीला निघून गेले.

महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दळवी मुंबईस गेले डॉ.आंबेडकरांची भेट घेतली महाराजांचा खास निरोप दिला.पण आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार होईनात.कारण संस्थानिकांच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.अखेर दळवींनी इतर संस्थानिकांपेक्षा महाराज कसे वेगळे असून अस्प्रुश्योद्धरांसाठी कसे काम करतात, हे सांगितल्यावर आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार झाले व ते कोल्हापुरला आले.

हेही पाहा: आंबेडकरी दिनविशेष 

पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची मैत्री जमली.मैत्री ही स्फ़ुल्लिंगासारखी असते, ती केंव्हा प्रकट होते हे सांगणे कठीण असते कित्येक वर्षाच्या सहवासानंतरही प्रकट होत नाही पण काही वेळी विश्वासाच्या वातावरणाने प्रगल्भता धारण केल्यास एकाच भेटीत ती चीरमैत्री होऊ शकते.असेच शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब यांच्या मैत्रीचे झाले.एकाच भेटीत चिरमैत्री जमली.पहिल्याच भेटीत डॉ. बाबासाहेबांनी अस्प्रुश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले.’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना आंबेडकरांनी महाराजांना सांगितले की "आपण 31 जानेवारीला 1920 ला पहिला अंक प्रकाशित केला.या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,"

" काय करू आता धरुनिया भीडा नि:शंक हे तोंड वाजविले ।

नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजुन नव्हे हित ।"

संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले " व्वा ! व्वा ! छान ! छान !!" असे सहजच म्हनुन गेले.

आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे व्रुत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगत असतानाच सोमवंशीय मित्र,हिंदू नागरीक, विटाळ विद्वंसक यांची उदाहरणे दिली.तसेच त्यांनी कारणेही सांगितली.त्या काळी व्रुत्तपत्रांना फ़ारश्या जाहीराती मिळत नसत.वर्गणीसारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असत आणि वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसत.महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.2,500 ची भरगोस मदत केली.या मदतीनंतर " मुकनायक" बोलु लागला.

20 मार्च 1920 रोजी करवीर राज्यातील "कागल" जहागिरीतील माणगाव या ठिकाणी अस्प्रुश्यांची पहिली ऐतिहासिक भव्य परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले होते.त्यावेळी मार्गदर्शन करताना भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख "माझे प्रिय मित्र आंबेडकर" असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना "प्रिय मित्र" म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.भाषणाच्या शेवटी आंबेडकरांना आग्रहाचे भोजनाचे आमंत्रन देताना म्हणाले,"आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांनी जाण्यापुर्वी मेहरबानीने माझे रजपुतवाडीच्या कॅंपवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी" महाराजांच्या आमंत्रणाचा स्विकार करून आंबेडकर सोनतळीला आले.भोजनाच्या वेळी महाराजांनी स्वत: आग्रह करून त्यांना यथेच्छ भोजन करावयास लावले.त्यानंतर आंबेडकर आगगाडीने मुंबईस जाणार होते, त्यावेळी महाराजांनी स्वत: स्टेशनवर येऊन त्यांना निरोप दिला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्याच दिवशी....| परिनिर्वाण मराठी चित्रपट 


डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी आली.शाहू महाराजांनी तर निश्चयच केला होता की "माझे राज्य गेले तरी बेहत्तर पण अस्प्रुश्योद्धराचे कार्य थांबविणार नाही" महाराजांच्या अशा या कार्यामुळे अस्प्रुश्य लोक शाहुंना आपला त्राता,उद्धारक ,मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानत होते.दिवसेंदिवस महाराज आणि आंबेडकर यांचा स्नेह वाढतच गेला.स्नेह माणसाला त्याग करायला शिकवतो, संकुचीत नात्याची तो सीमा पार करतो.असेच या दोघांच्या नात्यात घडत गेले.खरी मैत्री ही मोकळ्या ह्र्दयाने बोलत असते,केंव्हाही मदत करण्यास तयार असते.

4 सप्टेंबर 1921 रोजी लंडनहुन आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सामाजिक  लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी आंबेडकरांना किती आदर होता हे यावरून दिसून येते.आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली.त्यानंतर पुढे काही दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1922 रोजी लंडनहुन डॉ.आंबेडकरांचे महाराजांना पुनश्च मदत मागताना पत्र आले, त्या पत्रात ते म्हणतात, "मला परत येण्यास अवधी लागणार असल्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी हुजुरांनी क्रुपावंत होऊन रु.750 मदत करावी,आजवर जे अनेक उपकार हुजुरांनी केलेत त्यात हाही करतील अशी आशा आहे."हे पत्र मिळताच महाराजांनी मनिओर्डरने रुपये सातशे पन्नास पाठवून देण्याची व्यवस्था केली.

डॉ.बाबासाहेबांना शाहू महाराजांविषयी नेहमीच आदरभाव असे.उच्च जाती आपल्या स्वार्थासाठी ब्राह्मणेत्तर आणि बहिष्क्रुत यामध्ये कधीही एकी निर्माण न होता बेकीच रहावी यासाठी प्रयत्नशील होते.तशा प्रकारे ते हिन डावपेच खेळत.प्रत्येक वेळी ते डावपेच शाहू महाराज आपल्या मुत्सद्देगिरीच्या बळावर उधळून लावत.याबाबत 22 सप्टेंबर 1920 च्या "मुकनायक" मध्ये "प्रेम की सुड" या लेखात् आंबेडकर म्हणतात,"या विसाच्या शतकातील स्वयंनिर्णयाचा काळात राजर्षी शाहू छत्रपती यांनी ब्राह्मण जातीकडून नाडावलेल्या ब्राह्मणेत्तर व बहिष्क्रुत वर्गाच्या चळवळीचा पुरस्कार केल्यावर बहुजन समाजाकडून त्यांस मिळत असलेला धन्यवाद ब्राह्मण या जातीस न खपून त्यांनी बहिष्क्रुत व ब्राह्मणेत्तर या वर्गात् खुद्द मराठ्यांत फ़ुट पाडण्याचा अत्यंत घातक असा उपक्रम चालविला आहे".

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे 13 व 14 फ़ेब्रुवारी 1922 रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती.त्या परिषदेत आंबेडकरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढताना शाहू महाराज म्हणाले होते ."भिमराव आंबेडकर तुमचे महान नेते आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, त्यांचे अनुकरण करा व त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा.मी तर तुमच्या सेवेला वाहुन घेतले आहे, मला तुमची सेवा करू द्यावी ही विनंती." बाबासाहेब आंबेडकर अस्प्रुष्यता निर्मुलण व त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी "ऑल इंडिया डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन फ़ंड" संस्था उभी करणार होते, या संस्थेत शाहू महाराजांनी कोणत्याही लहानमोठ्या पदावर काम करण्याची इच्छा त्यांनी आंबेडकरांना रुकडी (कोल्हापुर) येथुन दि.7जुन 1920 रोजी लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.

" चांगला मनुष्यच चांगला मित्र होऊ शकतो" हे उभयतांच्या मैत्रीवरून स्पष्ट होते.

साभार : शाहुंच्या आठवणी

लेखक : प्रा.नानासाहेब साळुंखे

---------------------------------------------------------------

जय भीम 💙🙏

*आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.👇

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)