भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने 2016-17 मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सन 2018-19 पर्यंत 35,356 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी 117.42 कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.
योजनेच्या काही प्रमुख अटी!
- विद्यार्थ्यांना 10 वी,12 वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा अधिक नसावे.
- विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
- गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
स्वाधार योजना वैशिष्ट्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 हि योजना महाराष्ट्र शासनाने 2016 ते 2017 मध्ये सुरु केली. हि योजना एक शैक्षणिक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे तसेच इयत्ता अकरावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण घेण्यात सहायता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रुपात आर्थिक मदत केल्या जाते.
- महाराष्ट्र स्वाधार योजना या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे.
- स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक सहायता केली जाईल.
- स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी पदवी, डिप्लोमा तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी किंवा 12वी, पदवी / पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मर्यादा 50 टक्के असेल.
योजनेचे नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना |
द्वारा सुरू | महाराष्ट्र सरकार |
योजनेची सुरुवात | 2016-17 |
लाभार्थी | अनुसूचित जाती-जमाती व अन्य प्रवर्गातील विद्यार्थी |
उद्देश्य | शिक्षणात अर्थिक सहाय्य |
अधिकृत वेबसाईट | https://sjsa.maharashtra.gov.in |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र |
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
मिळणारा भत्ता | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम | इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ''क'' वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम | उर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम |
भोजन भत्ता | 32,000/- रुपये | 28,000/- रुपये | 25,000/- रुपये |
निवास भत्ता | 20,000/- रुपये | 15,000/- रुपये | 12,000/- रुपये |
निर्वाह भत्ता | 8,000/- रुपये | 8,000/- रुपये | 6,000/- रुपये |
असा एकूण भत्ता | 60,000/- रुपये | 51,000/- रुपये | 43,000/- रुपये |
वरील अनुदानाच्या धनराशी व्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
महाराष्ट्र स्वाधार योजना उद्देश
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करतांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना समोर जावे लागते, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा होतकरू आणि गुणवंत अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, तसेच त्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करता यावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाची सोय व इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरुपात या विद्यार्थ्यांची आर्थिक सहायता केली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न?
Q. महाराष्ट्र स्वाधार योजना काय आहे ?
महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबामधील पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हि शैक्षणिक योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे जेणेकरून या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे आणि त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे.
Q. महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
महाराष्ट्र स्वाधार योजना राज्यातील गरीब अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या परिवाराचे वार्षिक एकूण उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. ते विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत.
Q. महाराष्ट्र स्वाधार योजनेचा PDF कसा डाऊनलोड करावा ?
महाराष्ट्र स्वाधार योजनेची या लेखा मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच या योजनेचे PDF आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतो.
Q. स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहायता किती मिळते ?
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश मिळवलेल्या संस्थांच्या क्षेत्रांप्रमाणे अनुदानाची धनराशी निश्चित केल्या गेली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वार्षिक 51,000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.
Source:@Wikipedia and @https://sjsa.maharashtra.gov.in
धन्यवाद जय भीम
ReplyDelete