भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली, नवी मुंबई | संपूर्ण माहिती

Jay Bhim Talk
0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली, नवी मुंबई


नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सर्व दालने ही अत्यंत उत्कृष्ट आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भव्यतम स्मारकातील वातानुकूलीत अद्ययावत सभागृह, ध्यान केंद्र ( Meditation Center ), 'ई लायब्ररी' सुविधेसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक ऑडिओ सुविधेसह जीवन प्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन, आभासी चलचित्र विशेष कक्ष (Holographic Presentation) अशा विविध सुविधां उपलब्ध आहेत.
या स्मारकामध्ये असलेला आभासी चलचित्र विशेष कक्ष एक अत्यंत महत्वाचे आकर्षण असून यामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेबांचे भाषण होलोग्राफीक प्रेझेन्टेशनव्दारे बघण्याचा रोमांचकारी अनुभव घेता येणार आहे. 
अडीच एकरांच्या या भूखंडावर स्मारक उभे आहे. मुख्य सभागृह, खुला सभामंडप आणि प्रार्थनागृह अशी रचना असून त्यात कलादालन, ग्रंथालय, कॅफेटेरीया आणि बाहेर असलेल्या विद्युत जनित्राच्या जागी हिरवळ तयार करण्यात आली आहे. यासाठी 18 कोटींची तरतूद करण्यात आली होती. स्मारकास मार्बल आच्छादन लावण्यात आले आहे.


5750 चौ. मी. क्षेत्रफळावर ऐरोली सेक्टर 15 येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्य वास्तू उभारण्यात आली असून यामध्ये शिक्षण आणि ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत असा संदेश प्रसारीत करणारा पेनच्या निबच्या आकाराचा डोम उभारण्यात आलेला आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीची डोमसह उंची 50 मीटर इतकी असून डोमच्या खाली पहिल्या मजल्यावर 325 चौ.मी. क्षेत्रफळाचे साधारणत:300 नागरिकांना ध्यानसाधना (मेडिटेशन) करता येईल असे प्रार्थना स्थळ विकसित करण्यात आले आहे. याशिवाय या वास्तूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तूंचे वस्तू संग्रहालय, कला दालन, दोन वाचनालये व अभ्यासिका, बहुउद्देशीय सभागृह, पोडीयम गार्डन अशा कल्पक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली चे Location 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)