धम्मचक्र प्रवर्तन दिवस | Dhammchakra Pravartan Divas

Jay Bhim Talk
0

जाणून घ्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचे महत्त्व...



14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव आंबेडकर (Dr Babasaheb Aambedkar) यांनी त्यांच्या 6 लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली त्याचं दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Paravartan Din) असं म्हणतात. 

लोकांचे बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन साजरे करण्यासाठी अनेक बौद्ध या ठिकाणी एकत्र येवून हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव साजरा करतात.

हेही वाचा : 

डॉ. आंबेडकरांचा जन्म हिंदू (Hindu) धर्मात झाला होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. पण अखेरीस त्यांना बौध्द धर्माची शिकवण आवडली किंवा त्याच्या तत्वांना पटली आणि त्यांनी बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून या धर्माची निवड केली असल्याचं सागितल्या जातं. तरी नागपुरात (Nagpur) डॉं आंबेडकरांनी (Dr Ambedkar) बौध्द (Buddha Community) धर्माची दिक्षा घेतली म्हणून नागपुरात (Nagpur) धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.

हेही वाचा : 

धम्मचक्र प्रवर्तन दिन कसा साजरा करण्यात येतो त्यांचे महत्व काय आहे?      

बौद्ध धर्मीयांसाठी 14 ऑक्टोबर महत्वाचा समजला जातो. याच कारण म्हणजे बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर पूज्य महास्थविर चंद्रमणी याच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्याने 14 ऑक्टोबर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर अंदाजे 6 लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा :

या घटनेला ऐतिहासिक महत्व आहे. याचा उल्लेख धम्मक्रांती दिन असा सुद्धा करतात. 

धम्मदीक्षा दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी नागपूरच्या दिक्षा भूमीवर जमत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लाखो बौद्ध अनुयायी जमत असतात. तसेच देश –विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक यावेळी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने येतात.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)