संपूर्ण जयमङ्गल अट्ठगाथा आणि अर्थ ( मराठी मध्ये )
-----------------------------------
जयमङ्गल अट्ठगाथा Lyrics
----------------------------------
बाहुं सहस्समभिनिम्मित सायुधन्तं,
गिरिमेखलं उदित-होर-ससेनमारं।
दानादि धम्मविधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥1॥
मारातिरेकमभियुज्झित-सब्बरत्तिं,
घोरम्पनालवकमक्खमथद्ध-यक्खं।
खन्ती सुदन्त-विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥2॥
नालागिरिं जगवरं अतिमत्तभूतं,
दावग्गि-चक्कमसनीव सुदारुणन्तं।
मेत्तम्बुसेक-विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥3॥
उक्खित्त-खग्गमतिहत्थ-सुदारुणन्तं,
धावन्ति योजन-पथंगुलिमालवन्तं।
इद्धीभिसङ्खतमनो जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥4॥
कत्वान कट्ठमुदरं इव गब्धिनीया,
चिञ्चाय दुट्ठ वचनं जनकाय मज्झे।
सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥5॥
सच्चं विहाय-मतिसच्चक वादकेतुं,
वादाभिरोपित-मनं अति-अन्धभूतं।
पञ्ञापदीप-जलितो जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥6॥
नन्दोपनन्द-भुजगं विविधं महिद्धिं,
पुत्तेन थेर-भुजगेन दमापयन्तो।
इद्धूपदेस-विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि॥7॥
दुग्गाहदिट्ठि-भुजगेन सुदट्ठ-हत्थं,
ब्रह्मं विसुद्धि-जुतिमिद्धि-बकाभिधानं।
ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु जयमङ्गलानि॥8॥
________
जयमङ्गल अट्ठगाथा मराठी अर्थ
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हत्यार धारण करुन सहस्रबाहू गिरीमेखाला, हत्तीवर आरुढ झालेल्या, अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला, आपल्या दान आदि धम्म बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||2||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, माराव्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठूर-ह्रदयी अशा आलवक नामक यक्षाला, शांती आणि संयम बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||2||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, अग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्तम अशा निलगीरी हत्तीला आपल्या मैत्रीरुपी पावसाने जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो.||3||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत न थांबता धावणार्या अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या, आपल्या रिद्धी बलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||4||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने,पोटावर काष्ट बांधून गर्भवती सारखे आपले पोट मोठे त्या चिंचा नामक स्त्रीला(जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती) आपल्या शांत आणि सौम्य बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||5||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, सत्य सोडलेल्या व असत्य वादाचा पोषक, अभिमानी वादविवादात पारंगत व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकाला प्रज्ञा - दीपाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||6||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, विविध ऋद्धी संपन्न नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामौद़ल्यायन शिष्याकडून ऋद्धी, शक्ती आणि उपदेशाच्या बलानो जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||7||
ज्या मुनिन्द्राने- बुद्धाने, भयंकर मिथ्थादृष्टीरुपी सापाने डसलेल्या विशुद्ध ज्योती आणि ऋद्धी शक्ती संपन्न बक नामक ब्रम्हज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||8||
*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏