वंचित बहुजन आघाडी, इतिहास , 2019 लोकसभा मत , संपूर्ण माहिती | Vanchit Bahujan Aaghadi | VBA

Jay Bhim Talk
0

वंचित बहुजन आघाडी

राष्ट्रीय अध्यक्ष: ऍड. प्रकाश यशवंत आंबेडकर

स्थापना: मार्च 2019

झेंडा:

वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील एक आघाडीचा राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. 24 मार्च 2019 रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील 'राजकीय पक्ष' म्हणून नोंदणी झाली.प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत.

2019 मध्ये, या पक्षाने एआयएमआयएम पक्षासह 17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर AIMIM उमेदवार उभा होता तर इतर 47 जागांवर वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते. या युतीतील, इम्तियाज जलील हा एकमेव एआयएमआयएमचा उमेदवार विजयी झाला तर वंचीत बहुजन आघाडी चे संपूर्ण 47 उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये वंचीत बहुजन आघाडी ने 37 लाख (7.64%) मते मिळवली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने 288 पैकी 234 जागांवर आपले उमेदवार उभे केले, मात्र हे सर्वजण पराभूत झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने 25 लाख मतदान (4.6%) मिळाले. 12 लाख मतांनी वंचितचे मताधिक्य घटले.

वंचीत बहुजन आघाडी चा इतिहास 

1994 पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी 4 जुलै 1994 रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर 1995 च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. 1999 ते 2014 पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.

2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर राज्यात 23 उमेदवार उभे केले होते, मात्र सर्वांचा पराभव झाला. त्यांना एकत्रित 3,60,854 (0.7%) मते मिळाली होती. 2014 मध्ये झालेल्या 13 व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 70 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. सर्व उमेदवारांना एकत्रित 4,72,925 (0.9%) मते मिळाली होती.

20 मे 2018 रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अश्या समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या.

जून 2018 मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर 20 मे 2018 रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. 24 मार्च 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता दिली, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले होते.वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा 28 सप्टेंबर 2018 रोजी सोलापुरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एआयएमआयएमला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एआयएमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला.आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.

23 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची 200 गावठाणे आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.

हेही पाहा: हिन्दू कोड बिल 

या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण 12 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एआयएमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या."आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] 12 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] 22 जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट 48 जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.

मराठी भीम गीतांचे Lyrics साठी येथे क्लिक करा!

14 मार्च 2019 रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने 2019 च्या 17 व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर 2019 मध्ये त्यांची युती तुटली.

वंचित बहुजन आघाडी चा जाहीरनामा 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 06 एप्रिल 2019 रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या 27 मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ऑक्टोबर 2019 मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपला डिजीटल जाहिरनामा प्रसिद्ध केला, ज्यात "भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा" असल्याचे सांगितले.

वंचित बहुजन आघाडी 2019 लोकसभा 

महाराष्ट्रातील 2019 मधील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.त्यापैकी एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 80 हजारांहून अधिक मते घेतली आहेत.

हेही पाहा: भारतातील बौध्द समाज 

भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएमच्या उमेदवारांना 41,32,242 (7.64%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या 47 उमेदवारांना 37,43,200 एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या 6.92% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या 47 मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या 7.08% होते. महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात 5,40,54,245 एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात 11,98,221 मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तर 41 मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.

लोकनिती-सीएसडीएस संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बौद्ध धर्मीयांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा काँग्रेसला होता. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम मते 78% काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, 12% भाजप-शिवसेना युतीला व 1% वंबआ-एआयएमआयएम युतीसह इतर पक्षांना मिळाली. बौद्ध मते 81% वंचित बहुजन आघाडीला, 12% काँग्रेस आघाडीला, व 07% भाजप-सेना युतीला मिळाली.

*वरील लेखा मध्ये दिलेली माहिती ही Wikipedia च्या मदतीने घेतलेली आहे.

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करा. जय भीम 💙🙏

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)