या माझ्या दलित बांधवानो मराठी Lyrics | Bhim Song Lyrics

Jay Bhim Talk
1
या माझ्या दलित बांधवानो Bhim Song Lyrics  | Ya Majhya Dalit Bandhvanno Lyrics 
-------------------------------------
Album- 
Singer - वैशाली माडे 
Music by - 
Music Label - 
Release Date - 
----------------------------------

या माझ्या दलित बांधवानो Bhim Song Lyrics 

या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो

देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे

वर्षानुवर्षे हीन लेखूनिया
दूर लोटिले ज्या समाज्या

धुरा खांद्यावर मी वाहील तयाची
लावून पना प्राण माझा
विजयाच्या लावून पताका
मुक्यांना ही फोडीन वाचा

चालाया लावीन लुळे पांगळे
काळाराम मंदिर चवदार चे तळे

माणूस असुनी तुम्हा माणसांना
माणुसकीची जाणं नाही

मिंदे पणा सोड चल उठ गोवर्धन
जगण्यात या शान नाही

मुक्त बंधनातून व्हावंया
संग्राम या पुढे लढावया
तोडून सनातन रुढी चे कडे
काळाराम मंदिर चवदार चे तळे

या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो

देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे

*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

1Comments

  1. धन्यवाद जय भीम 💙

    ReplyDelete
Post a Comment