रमाई घरकुल योजना महाराष्ट्र: गरीब कुटुंबांसाठी पक्क्या घरांचे स्वप्न
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी रमाई घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे. गरीब कुटुंबांची आर्थिक स्थिती दुर्बल असल्यामुळे स्वतःचे घर बांधणे त्यांच्यासाठी कठीण असते. महाराष्ट्र शासनाने त्यांची ही समस्या ओळखून, या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
योजनेची आवश्यकता आणि उद्दिष्ट
राज्यातील अनेक गरीब कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली राहतात आणि कच्च्या, पडक्या घरात जगतात. हे घर ऊन, पाऊस, वारा यांपासून संरक्षण देत नाहीत. अनेकदा हे कच्चे घर वादळात किंवा मुसळधार पावसात पडण्याचा धोका असतो, ज्यामुळे जीवित आणि आर्थिक हानी होऊ शकते. यासाठीच राज्यातील गरीब कुटुंबांना निवाऱ्याचे सुरक्षित ठिकाण मिळावे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे. योजनेअंतर्गत राज्यातील 51 लाख गरीब कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेत आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक कुटुंबांना घर उपलब्ध करून दिले आहे, आणि भविष्यात आणखी वाढविण्यात येणार आहे.
SC आणि ST च्या विद्यार्थ्यासाठी कार्यरत असणाऱ्या विविध योजना येथे क्लिक करा!
योजनेची अंमलबजावणी
योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान:
प्रकार | अनुदान |
---|---|
सर्वसाधारण क्षेत्रासाठी | 1,32,000/- रुपये अनुदान दिले जाते. |
शहरी भागासाठी घर बांधकामासाठी | 2,50,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते. |
डोंगराळ भागासाठी | 1,42,000/- रुपये अनुदान दिले जाते. |
शौचालय बांधण्यासाठी | 12,000/- रुपयांची तरतूद केली गेली आहे. |
रमाई घरकुल योजना अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी राज्यातील लाभार्थी कुटुंबांना ₹2,50,000 पर्यंत अनुदान दिले जाते. ग्रामीण क्षेत्रासाठी अनुदानाची मर्यादा ₹1 लाख, नगरपालिका क्षेत्रासाठी ₹1.5 लाख, तर महानगरपालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी ₹2 लाख आहे. योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थीने कच्च्या घरात राहत असणे गरजेचे आहे. तसेच या कुटुंबांवर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वाईट परिणाम होत असल्याने त्यांना प्राधान्य दिले जाते.
योजनेअंतर्गत अनुदान वितरण कार्यपद्धती:
हप्ता | वितरण प्रक्रिया |
---|---|
पहिला हप्ता | घरकुलाचे 50 टक्के अनुदान घराचे बांधकाम सुरू करताना लाभार्थ्याच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. |
दुसरा हप्ता | 50 टक्के निधीचा उपयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40 टक्के अनुदान लाभार्थ्याच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. |
तिसरा हप्ता | घर पूर्ण झाल्यावर घराचा ताबा देता येतो आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँक खात्यात उर्वरित 40 टक्के अनुदान लाभार्थ्याच्या नावे जमा केले जाते. |
योजनेच्या अटींमध्ये झालेले बदल
- अपंग लाभार्थ्यांसाठी शिथिलता: अनुसूचित जातीतील 40% पेक्षा जास्त अपंग लाभार्थ्यांना दारिद्र्य रेषेखाली असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. अशा लाभार्थ्यांना वार्षिक उत्पन्न ₹1 लाख पर्यंत असल्यास योजनेचा लाभ दिला जाईल.
- अनुदान वाढ: ग्रामीण घरांसाठी अनुदानाची किंमत ₹70,000 वरून ₹1 लाख करण्यात आली आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील अनुदान तदनुसार वाढवण्यात आले आहे.
- 7/12 उतारा अट शिथिल: शहरी भागात लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन नसल्यास 7/12 उतारा सादर करण्याची अट वगळण्यात आली आहे. अशा लाभार्थ्यांना महानगरपालिका, नगरपालिका किंवा शासनाच्या जमिनीवर राहण्याचा लाभ मिळवण्यासाठी ही शिथिलता दिली जाते.
लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असते
रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार पारदर्शक पद्धतीने होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकांतील ज्यांच्याकडे घर नाही किंवा जे कच्च्या घरात राहतात अशा कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. ग्रामसभा, पंचायत समिती, आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत ही निवड प्रक्रिया पूर्ण होते.
SC आणि ST साठी असणाऱ्या विविध योजना ची माहिती साठी आताच आपल्या चॅनल मध्ये सहभागी व्हा!
लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते, ज्यात अनुसूचित जाती, जमाती आणि नवबौद्ध घटकांतील कुटुंबांना 3% घरे राखून दिली जातात.
योजनेची कार्यपद्धती
- लाभार्थ्यांची निवड झाल्यावर त्यांचे कच्च्या घराचे Geo Tagging केले जाते आणि अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण होते.
- लाभार्थ्यांचे बँक खाते PFMS प्रणाली मध्ये संलग्न केले जाते जेणेकरून त्यांना मिळणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
- ग्रामपंचायत समिती लाभार्थ्याची यादी जिल्हा स्तरावर सादर करते आणि त्यानंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
- बांधकाम सुरू झाल्यावर अधिकारी लाभार्थ्याच्या घरकुलाच्या कामावर देखरेख ठेवतात आणि त्यानुसार हप्त्यांची वाटप होते.
योजने साठी आवश्यक कागदपत्रे:
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, लाभार्थ्यांचे मतदान कार्ड
- पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल
- मोबाईल नंबर
- दारिद्र्य रेषेखालील दाखला: BPL प्रमाणपत्र, पिवळे रेशनकार्ड
- मृत्यू प्रमाणपत्र: अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- संमतीपत्र: घर बांधावयाच्या जागेत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र
- जन्म प्रमाणपत्र: जन्म दाखला किंवा जन्मतारीख नमुद असलेला शाळेचा दाखला
- हमीपत्र: या आधी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही याचे हमीपत्र
- अर्जदार पूरग्रस्त असल्यास त्याचा दाखला
- अर्जदार पीडित असल्यास त्याचा दाखला
- प्रतिज्ञापत्र: 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र
- ई-मेल आयडी
- फोटो: लाभार्थ्यांचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खात्याचा तपशील: बँक पासबुक झेरॉक्स
- घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बील या कागदपत्रांपैकी एक
- जात प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
- उत्पन्नाचा दाखला: सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
- सरपंच/तलाठ्याचा दाखला
- महानगरपालिका/ नगरपालिकेतील मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत
अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार विचारलेली माहिती भरली गेली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार कुटुंबांची या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने दिलेल्या अटी पेक्षा जास्त असल्यास
- अर्जदार कुटुंबाचे पक्के घर असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार कुटुंब राज्यात किमान 15 वर्ष वास्तव्यास नसल्यास
- अर्जदार शासकीय नोकरीत कार्यरत असल्यास
- अर्जदार कुटुंब आयकर दाता असल्यास
- अर्जात विचारलेली माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीने अर्जात कुटुंबातील इतर सदस्यांच्या बँक खात्याची माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदार कुटुंब अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवं बौद्ध वर्गातील नसल्यास.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
- ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रमाई घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज ग्रामपंचाय कार्यालतय जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची रमाई घरकुल योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर रमाई घरकुल योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक अशी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- अर्जात सर्व माहिती तसेच कागदपत्रे अपलोड करून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची रमाई घरकुल योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाईन लाभार्थी यादी बघण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर रमाई घरकुल योजना लाभार्थी यादी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर लाभार्थी यादी दिसेल ती यादी तुमच्या कॉम्पुटर मध्ये डाउनलोड करायची आहे.
- आता डाउनलोड केलेल्या यादी मध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे.
नवीन बदल काय झाले
योजना सुधारणा करण्यात आली आहे, जसे की बांधकाम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना गॅस शेगडी देखील दिली जाते. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळतो आणि त्यांची सुरक्षितता आणि रहाणीमान उंचावते.
रमाई आवास योजना ची अधिकृत संकेतस्थळ
रमाई घरकुल योजना ही राज्यातील गरीब कुटुंबांसाठी एक महत्वाची योजना आहे. अशा कुटुंबांसाठी स्वतःचे पक्के घर बांधणे ही स्वप्नवत गोष्ट असते. ही योजना गरीब कुटुंबांना सुरक्षित घर मिळवून देण्यासोबतच त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीला बळकट करण्याचा प्रयत्न करते.
या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.
जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम
आम्हाला Instagram वर फॉलो करा!
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.