माता रमाई यांच्या विषयी माहिती नसणाऱ्या 10 गोष्टी | 10 Facts About Ramabai Ambedakr

Admin
0

रमाबाई आंबेडकर यांच्या विषयी माहिती नसणारे 10 Facts | Ramabai Ambedakr 10 Facts | Facts About Ramabai Ambedakr | रमाबाई आंबेडकर 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका गरीब दलित कुटुंबात झाला. त्यांना 'रमाई' किंवा 'रमा आई' असेही संबोधले जाते. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर रमाबाईंचा खूप प्रभाव पडला. त्यांनीच बाबासाहेबांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय आणि सुधारणांसाठीच्या प्रयत्नांना ही पाठबळ दिलं. आज आपण त्यांच्या आयुष्यातील 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. (Facts about Ramabai Ambedkar)

1) 1898 मध्ये भिकू धात्रे आणि रुक्मिणी यांच्या पोटी रमाबाईंचा जन्म झाला. दाभोळ येथील बंदरातून त्यांचे वडील पैशांसाठी बाजारात मासळीच्या टोपल्या घेऊन जात.

2) आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच आई-वडीलांना गमावल्यामुळे गोराबाई, मीराबाई आणि शंकर या त्यांच्या भावंडांसह त्यांचे पालनपोषण त्यांच्या काकांनी मुंबईत केले.

3) 1906 मध्ये भायखळ्याच्या बाजारपेठेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रमाबाईंचा विवाह झाला. बाबासाहेबांशी विवाह झाला त्यावेळी रमाई 9 वर्षांच्या तर बाबासाहेब 15 वर्षांचे होते.

माता रमाई आंबेडकर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर 

हेही पाहा: डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्याबद्दल माहिती नसणाऱ्या 20 गोष्टी | 20 Unknown facts about Dr Babasaheb Ambedkar

4) रमाबाई बाबासाहेबांना आपुलकीने 'साहेब' म्हणायच्या तर बाबासाहेब आपुलकीने त्यांना 'रामू' म्हणत.

5) आंबेडकर त्यांच्या अभ्यासासाठी परदेशात असताना त्यांनी प्रचंड त्रास सहन केला, परंतु यामुळे त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या समाजकार्यासाठी कधीही थांबवले नाही.

6) कमीत कमी खर्चात घर चालावं यासाठी शेणाच्या गौऱ्या स्वतः बनवून त्या डोक्यावरून घरी आणायच्या. अशा छोट्या छोट्या गोष्टीत बचत करून घर चालवल्यामुळे आंबेडकरांना परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेण्यास मदत झाली," असे चित्रपट निर्माता सुनील शर्मा यांनी सांगितले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाईस लिहिलेलं पत्र येथे क्लिक करा!

7) लग्नाच्या 29 वर्षानंतर 26 मे 1935 रोजी दीर्घ आजारामुळे रमाबाईंचे निधन झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा परिवार

8) 'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर' या टीव्ही मालिकेत रमाबाईंनी बाबासाहेबांना कसे प्रोत्साहित केले हे दाखवले आहे. याशिवाय इतर काही मालिका आणि चित्रपटांमध्ये रमाबाईंनी बाबासाहेबांना कशा प्रकारे साथ दिली, हे दाखवले आहे.

Ambedkarite Films / Movies साठी येथे क्लिक करा!

9) रमाबाईंच्या सन्मानार्थ देशभरातील अनेक ठिकाणांना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

10) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 मध्ये त्यांच्या जीवनावरील 'थॉट्स ऑन पाकिस्तान' (Thoughts On Pakistan) हे पुस्तक त्यांनी रमाबाईंना समर्पित केलं होतं. त्यात त्यांच्या हृदयाचा चांगुलपणा, आणि मनाची कुलीनता, संयम आणि संकट सहन करण्याची तयारी इ. गोष्टी स्पष्ट केल्या आहेत." या पुस्तकात बाबासाहेबांनी आपल्या जीवनावरील रमाबाईंच्या प्रभावाची कबुली दिली आहे.

माता रमाई आंबेडकर यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!

मुख्य लेख: ESakal 

या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Youtube Channel Image
Jaybhimtalk Subscribe For Ambedkarite News, Content, Songs, Movies and More!
Subscribe