अमरावतीतून डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश चळवळीला सुरुवात केली होती | अमरावती मंदिर प्रवेश चळवळ | काळाराम मंदिर सत्याग्रह

Admin
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाला सुरुवात अमरावतीतून केली होती | अमरावती मंदिर प्रवेश | काळाराम मंदिर सत्याग्रह | Kalaram Temple Satyagraha 

अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरात असणाऱ्या इंद्रभुवन थिएटर येथे 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेत मंदिर प्रवेश सत्याग्रह परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाषण देत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू निवर्तले, अशी तार आली होती.

मात्र येथे उपस्थित सर्वच माझे भाऊ आहेत, असे म्हणत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाच्या चळवळीला दिशा दिली, असे डॉ. भीमराव वाघमारे यांनी सांगितले. या चळवळीला यशही आले आणि अमरावतीत अस्पृश्यांना श्री अंबादेवी मंदिरात प्रवेशही मिळाला होता. यानंतर मंदिर प्रवेशाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. यानंतरच नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ आणि पुण्यातील पार्वती मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू झाली असल्याचे डॉ. भीमराव वाघमारे म्हणाले.

हेही पाहा: काळाराम मंदिर सत्याग्रह: सत्याग्रहाच्या दिवशी नक्की काय घडले होते? संपुर्ण माहिती | Kalaram Temple Satyagraha Nashik

अस्पृश्यांनाही मंदिरात प्रवेशाचा अधिकार

अमरावती अस्पृश्यांनाही मंदिरात प्रवेशाचा अधिकार आहे आणि यामुळेच अस्पृश्यांना ही मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली होती. या चळवळीचा प्रारंभ अमरावती शहरातील श्री अंबादेवी मंदिरातून झाला. याबाबत आंबेडकरी विचारवंत आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भीमराव वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमरावतीला दोन वेळा दिलेल्या भेटीचा इतिहास उलगडला.

डॉ आंबेडकर यांची अमरावतीत भेट 

13 आणि 14 नोव्हेंबर 1927 आले होते अमरावतीला - मार्च 1927 च्या महाडच्या सत्याग्रहात अनेक अस्पृश्यांवर अत्याचार करण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूकनायक हे पत्रक बंद पडले होते. असे असताना अवघ्या काही दिवसातच तीन एप्रिल 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्रक काढले. बहिष्कृत भारतातील लेखांच्या माध्यमातून अमरावती शहरात मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू झाली. त्यावेळी संपतराव नाईक , डॉ.पंजाबराव देशमुख, बॅरिस्टर तिडके, गणेश गवई आदी मंडळींनी एकत्रित येऊन सत्याग्रह परिषदेची स्थापना केली. सत्याग्रह परिषदेच्या माध्यमातून श्री अंबादेवी मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा मंदिर प्रवेशासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला.

हेही पाहा : चवदार तळ्याचा सत्याग्रह | Chavdar Tale Satyagraha | Jaybhimtalk

मात्र सनातनी धर्माविरोधात आम्ही जाणार नाही, अशी भूमिका मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे मंदिर प्रवेश चळवळ बळकट करण्याच्या उद्देशाने अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरात असणाऱ्या इंद्रभुवन थिएटर येथे 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेत सत्याग्रह परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाषण देत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू निवर्तले, अशी तार आली होती. मात्र येथे उपस्थित सर्वच माझे भाऊ आहेत, असे म्हणत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाच्या चळवळीला दिशा दिली, असे डॉ. भीमराव वाघमारे यांनी सांगितले. या चळवळीला यशही आले आणि अमरावतीत अस्पृश्यांना श्री अंबादेवी मंदिरात प्रवेशही मिळाला होता. यानंतर मंदिर प्रवेशाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. यानंतरच नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ आणि पुण्यातील पार्वती मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू झाली असल्याचे डॉ. भीमराव वाघमारे म्हणाले.

14 मे 1936 लाही बाबासाहेबांनी केला अमरावतीचा दौरा

13 आणि 14 नोव्हेंबर 1927 ला मंदिर प्रवेशासाठी अमरावतीत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नऊ वर्षानंतर 14 मे 1936 ला अमरावतीचा दौरा केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या दौर्‍यात त्यांनी आता अस्पृश्य म्हणणाऱ्यांना मंदिरात जाण्याची गरज नाही. आम्ही धर्म परिवर्तन करणार आहोत, असा संदेश देत अस्पृश्यांमध्ये धर्मपरिवर्तन बाबत जनजागृती या दौऱ्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली असल्याचे डॉ. भीमराव वाघमारे म्हणाले.

मुख्य लेख / स्रोत : ETV Bharat 

वरील माहिती मध्ये जर काही चुक झाली असेल तर नक्की आम्हाला E-Mail द्वारे कळवा, आम्हाला Suggestions देण्यासाठी येथे क्लिक करा!

Latest Updates साठी आम्हाला WhatsApp, Facebook, Instagram ला फॉलो आणि YouTube ला Subscribe करून Support करा! जय शिवराय जय भीम 💙🧡🙏!

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Youtube Channel Image
Jaybhimtalk Subscribe For Ambedkarite News, Content, Songs, Movies and More!
Subscribe