लेखक: वामनदादा कर्डक
गायक: Vijayanamd Jadhav
संगीत:
लेबल:
--------------------------------------------------------------
Tufanatle Dive (तुफानातले दिवे) Lyrics
तुफानातले दिवे
आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा
मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले
अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा
जरा न खाली लवे.
हाय बिचारा दुबळा वारा
निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्याने मावळणारी
जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून
मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून
तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे,
काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले
अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,
चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड
येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,
प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी
नांदणे हेच अम्हाला हवे
तुफानातले दिवे
आम्ही तुफानातले दिवे
अशाच नवीन आणि जुन्या भीम गीतांचे Lyrics WhatsApp वर मिळवण्याकरिता आताच आपल्या चॅनेल मध्ये सहभागी व्हा! आम्हाला Instagram, Facebook आणि YouTube वर Subscribe करून सहकार्य करा, जय भीम!
© All rights of this song belong to their Respective Owners, we only upload the lyrics of this song only for promotional purposes. For Credits & Removel E-Mail Us!