म. फुले लिखीत छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा| Shivaji Maharaj Povada | शिवाजी राजांचा पोवाडा
संपूर्ण पोवाडा वाचण्यासाठी खाली जा👇!
जून, 1869 साली जोतिरावांनी “पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा” या नावाने पोवाडा लिहिला. मुंबईच्या ओरिएन्टल छापखाण्याने तो प्रकाशित केला. हा पोवाडा म्हणजे निव्वळ भाटगिरी नसून तत्कालीन काळातील उपलब्ध असलेला वेगवेगळ्या भाषामधील पुराव्यांचा अभ्यास करुन मांडलेले खरे शिवचरित्र आहे. एव्हाना शिवचरित्रावर प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक आहे. शिवाजी महाराजांच्या गुरुत्वाचा वाद निर्माण करणार्यांसाठी महात्मा फुलेंचा पोवाडा म्हणजे सणसणीत चपराकच आहे. महात्मा फुले स्पष्टपणे नोंदवितात की,
“मासा पाणी खेळे। गुरु कोण त्याचा॥
पवाडा गातो छत्रपती शिवाजीचा॥”
हेही पाहा: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छ. शिवाजी महाराज यांच्यावर विचार येथे क्लिक करा!
दादोजी कोंडदेवाने शिवाजीराजांना शिक्षण दिले, हेच जोतिरावांना मान्य नव्हते. कारण ज्या मुलाच्या आधीच्या दोन पिढ्या राजकारणात गेल्या त्याला दुसर्या कुणाकडून राजकारणाचे धडे घेण्याची काय गरज होती? म्हणून जोतिराव म्हणतात-“माशाच्या मुलाला पाण्यात पोहायला शिकवावं लागतं नाही.” आणि म्हणूनच कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांचा उल्लेख जोतिरावांनी पराक्रमी भोसल्यांचा पुत्र” व पेशव्याचा धनी” असा केला. ह्या पवाड्याचे जोतिरावांनी आठ भाग केले होते. बालशिवाजीचे वर्णन, अफजलखान वध, शाहिस्तेखानाला शास्त, तानाजी व बाजीप्रभू यांचे शौर्य, मिर्झाराजा जयसिंहाची भेट, आगर्याहून सुटका, राज्याभिषेक आणि छत्रपतींचा मृत्यू ह्या घटना त्यात आहेत.
शिवचरित्राच्या अभ्यासाने प्रभावित झालेले जोतिराव शिवसमाधीच्या दर्शनासाठी रायगडावर पोहचले. गगनाला भिडणारी राजधानीचा रायगड पाहिला. शिवसमाधीच्या समाधीची जागा शोधून काढली. काट्याकुट्यात हरवलेले, झाडाझुडप्यात वेढलेले ते समाधीस्थळ जोतिरावांनी स्वत: साफ केले, मातीचे ढिगारे सरकविले, कुर्हाडीच्या मदतीने झुडूप-वेली बाजूला केल्या. त्या समाधीवर मस्तक ठेवून नम्रतापूर्वक वंदन केले. पुष्प फुले अर्पण केलीत.
संपूर्ण पोवाडा वाचण्यासाठी येथे क्लिक करा!
पण तितक्यात ग्रामजोशी तिथे हजर झाला, त्याने ते दृश्य पाहिले. संतापात समोर येऊन ओरडला, “अरे ए, त्या शूद्र शिवाजीच्या समाधीला फुले वाहून पूजा करतोस, आणि मी ग्रामजोशी असूनही मला दक्षिणा नाही केवढा हा माझा अपमान.” असे म्हणून त्याने समाधीवरची फुले लाथेने उधळवून लावली. जोतिरावांच्या अंगाचा तिळपापड झाला. खवळलेले जोतिराव कडाडले, “अरे स्वार्थी माणसा, ज्यांच्या जीवावर सत्ता भोगली त्या तुमच्या बापाला विसरलात. निघ इथून नाहीतर खांडोळी करीन.”
अन् जोतिरावांचा तो रुद्रावतार पाहून ग्रामजोशाने तिथून पळ काढला. जोतिरावांनी स्वत: जवळचे पैसे तिथल्या एका गरीब माणसाला देऊन शिवसमाधीच्या दिवाबत्तीची व्यवस्था करवून दिली. कारण शिवरायांचे खरे कर्तृत्व जोतिरावांना ठाऊक होते. लोक कल्याणासाठी, गोरगरीबासाठी काम करणारा शिवाजी सारखा राजा दुसरा झालाच नाही, ही जोतिरावांची धारणा होती. जोतिराव त्यांच्या पोवाड्यात स्पष्टपणे लिहितात-
“सोसिले उन्हातान्हाला । भ्याला नाही पावसाला॥
डोंगर-कंगर फिरला। यवन जेरीस आणला॥
लहान मोठ्या पागेला। कधी नाही विसरला॥
राजा क्षत्रियांमध्ये पहिला। नाही दुसरा उपमेला॥”
जोतिराव पोवाड्यात शिवछत्रपतींचा उल्लेख ‘धर्मरक्षक’ किंवा ‘प्रतिपालक’ असा न करता ‘कुळवाडीभूषण’ असा करतात. ही ऐतिहासिक सत्यता आज समोर येणे गरजेचे आहे.
शिवजयंती उत्सवाची सुरुवात सुद्धा महात्मा जोतिराव फुले यांनीच केली. रायगडावर परत आल्यानंतर जोतिरावांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत शिवचरित्राबाबत चर्चा केली. आणि त्याचे पर्यावसान शिवजयंती महोत्सवात झाले. सन 1870 पासून जोतिरावांनी पुण्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करायला सुरुवात केली. [ राजरत्न आंबेडकर यांच्या फेसबुक Post वरून ]
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा चे भाग 1 - 8
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 1 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 2 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 3 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 4 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 5 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 6 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 7 साठी येथे क्लिक करा!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 8 साठी येथे क्लिक करा!
या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.
जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम
आम्हाला Instagram वर फॉलो करा!
आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.